जिल्हा परिषद ठाणे (☎ 9619648084)
कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती    ( नोंदणीसाठी येथे क्लिक करा )


योजनेबद्दल माहिती

1   योजनेचे नांव - शेतकरी/ शेतमजूर/ बचतगट यांना सुधारित कृषी अवजारांचा पुरवठा करणे

लाभार्थी अर्ज स्विकारतांना शेतक-यांच्या स्वत:चे नावे असलेल्या शेती क्षेत्राचे 7/12 किंवा 8-अ उतारा, लाभार्थी अ.जा./अ.ज. प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचे वैध जात प्रमाणपत्राची प्रत, आधारकार्ड व आधारकार्ड संलग्न बँक पासबुक छायांकित प्रत व औजार/साहित्याचा टेस्ट रिपोर्ट व अधिकृत साहित्य विक्रेत्याचे कोटेशन अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे. योजनेची द्विरुक्ती टाळण्यासाठी संबंधित शेतक-याने यापूर्वी सदर घटकाचा लाभ न घेतल्याबाबतचे राज्य कृषि विभागाच्या सहाय्यक कृषि अधिकारी यांचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. शेतक-यांना गुणवत्तापूर्ण यंत्र/औजारांचा पुरवठा व्हावा म्हणून शेतक-यांनी केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम संस्थांनी ज्या कृषि यंत्र/औजारांची रितसर परिक्षण (Testing) करुन ते BIS अथवा सक्षम संस्थानी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार (Standards/Specification) असल्याचे प्रमाणित केले असेल अशाच यंत्र/औजारांना कृषि अधिकारी, पंचायत समिती यांनी पूर्वसंमती प्रदान करावी.

विविध शेतीपिके, फळपिके व अन्न पिके यांचा उत्पादन खर्च पाहिला तर त्यामध्ये "मजुरी" या घटकावर मोठा खर्च होतो. त्याप्रमाणे शेतीच्या विविध कामांना वेळही जास्त लागतो. "मजुरी" या घटकावरील खर्च कमी व्हावा शिवाय शेतीची विविध कामे कमी वेळेत, मुदतीत व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी सुधारीत कृषि औजारांचा वापर वाढणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना तसेच बचतगटांना स्वयंचलित यंत्राने तसेच मनुष्यबळाने चालणारी विविध सुधारीत औजारे DBT तत्वावर अनुदान देणे.

सदर योजनेचा लाभ शेतकरी, शेतमजूर, बचतगट, आत्माअंतर्गत शेतकरी उतपादक कंपन्या यांना देय राहील. शेतमजूर, बचतगट, आत्मा अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी यांचे बाबतीत रोजगार निर्मिती हा उददेश असल्याने त्यांचे स्वत:च्या नावे शेतजमीन असण्याची आवश्यकता नाही.

1) सदर योजनेंतर्गत लाभ घेताना लाभार्थ्यांनी यापूर्वी सदर घटकाचा लाभ घेतलेला नसलेबाबत स्वयंघोषणापत्र सादर करावे.
2) एकदा संबंधित योजनेतील एखाद्या घटकाचा लाभ घेतल्यास पुढील पाच वर्ष त्याच लाभार्थ्यास या योजनेतील त्याच घटकाचा लाभ देय होणार नाही.

अर्ज करा

2   योजनेचे नांव - शेतकऱ्यांना पीक संरक्षणाकरिता काटेरी तार / जैविक कुंपणासाठी अर्थसहाय्य करणे

लाभार्थी अर्ज स्विकारतांना शेतक-यांच्या स्वत:चे नावे असलेल्या शेती क्षेत्राचे 7/12 किंवा 8-अ उतारा, लाभार्थी अ.जा./अ.ज. प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचे वैध जात प्रमाणपत्राची प्रत, आधारकार्ड व आधारकार्ड संलग्न बँक पासबुक छायांकित प्रत व साहित्याचा BIS Certificate व अधिकृत साहित्य विक्रेत्याचे कोटेशन अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे. शासनाकडील शामा प्रसाद मुखर्जी कुंपण योजनेची द्विरुक्ती टाळण्यासाठी संबंधित शेतक-याने यापूर्वी सदर घटकाचा लाभ न घेतल्याबाबतचे राज्य कृषि विभागाच्या सहाय्यक कृषि अधिकारी यांचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. शेतक-यांना गुणवत्तापूर्ण यंत्र/औजारांचा पुरवठा व्हावा म्हणून शेतक-यांनी BIS प्रमाणकानुसार (Standards/Specification) साहित्य असल्याचे प्रमाणित केले असेल अशाच साहित्यांना कृषि अधिकारी, पंचायत समिती यांनी पूर्वसंमती प्रदान करावी.

शेतक-यांना त्याच्या शेतीचे तसेच पिकाचे मोकाट जनावरे व वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्याकरीता काटेरी तार, जाळीची तार (Chain link Wire), जैविक कुंपनाकरिता DBT तत्वावर अनुदान देणे.

1) लाभार्थी शेतकऱ्याकडे स्वत:ची शेतजमीन असावी.
2) सदर योजनेकरीता जिल्हयातील सर्व घटकातील व वर्गवारीतील शेतकरी पात्र राहतील.
3) प्रति लाभार्थी शेतकरी यांना कमीत कमी 20 गुंठे ते जास्तीत जास्त 2 एकर क्षेत्र मर्यादेत अनुदान देय राहील.
4) 20 गुंठेपेक्षा कमी क्षेत्रास अनुदान देय राहणार नाही.
5) योजनेअंतर्गत साहीत्य लाभार्थ्याकडे उपलब्ध असून ते प्रत्यक्ष क्षेत्रावर लावण्यात आले असल्याची खात्री केल्याबाबतचे विस्तार अधिकारी (कृषि), कृषि अधिकारी, पंचायत समिती यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
6) शासन स्तरावरुन प्राप्त होणारे DBT द्वारे खरेदीबाबतचे धोरण लागू राहील.
7) सदर योजनेंतर्गत लाभ घेताना लाभार्थ्यांनी यापूर्वी सदर घटकाचा लाभ घेतलेला नसलेबाबत स्वयंघोषणापत्र सादर करावे.
8) एकदा संबंधित योजनेचा लाभ घेतल्यास पुढील पाच वर्ष त्याच लाभार्थ्यास या योजनेचा लाभ देय होणार नाही.

अर्ज करा

3   योजनेचे नांव - कृषी क्षेत्रात प्लास्टिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे

लाभार्थी अर्ज स्विकारतांना शेतक-यांच्या स्वत:चे नावे असलेल्या शेती क्षेत्राचे 7/12 किंवा 8-अ उतारा, लाभार्थी अ.जा./अ.ज. प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचे वैध जात प्रमाणपत्राची प्रत, आधारकार्ड व आधारकार्ड संलग्न बँक पासबुक छायांकित प्रत व साहित्याचा टेस्ट रिपोर्ट व अधिकृत साहित्य विक्रेत्याचे कोटेशन अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे. योजनेची द्विरुक्ती टाळण्यासाठी संबंधित शेतक-याने यापूर्वी सदर घटकाचा लाभ न घेतल्याबाबतचे राज्य कृषि विभागाच्या सहाय्यक कृषि अधिकारी यांचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. प्लॅस्ठीक मल्चींग या घटकाचा लाभ घेण्याकरिता शेतक-यांचे नांवे फळपिके, भाजीपाला लागवडीची नोंद 7/12 उता-यावर असणे आवश्यक आहे. प्लॅस्टीक मल्चींग या घटकाकरिता साहित्य हे भारतीय मानांकन प्राप्त (IS 17216 :2019) या दर्जाचे असावे. ताडपत्री या घटकाकरिता साहित्य हे भारतीय मानांकन प्राप्त (IS 2089:1972/1977 व IS 14597:1998) या दर्जाचे असावे. अशाच उच्च दर्जाच्या साहित्याची व कागदपत्रांची खातरजमा करुन कृषि अधिकारी, पंचायत समिती यांनी पूर्वसंमती प्रदान करावी.

तृणधान्य, कडधान्य, फळपिक, भाजीपाला, फुलशेती, अन्नपिके यांचे संरक्षण करण्यासाठी एचडीपीई ताडपत्री इत्यादीस प्रोत्साहन देणे. उत्पादन वाढीसाठी, तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, बाष्पीभवन टाळून जमीनीतील ओलावा टिकून राहण्याकरिता तसेच जमिनीमध्ये वाफसा स्थिती टिकून राहण्यासाठी, पिकाचे संरक्षण होण्याकरिता यु.व्ही. संस्कारित प्लॅस्टिक फिल्म वापरास प्रोत्साहन देणे.

सदर योजनेचा लाभ शेतकरी, शेतमजूर, बचतगट, आत्माअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या यांना देय राहील. शेतमजूर, बचतगट, आत्मा अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी यांचे बाबतीत रोजगार निर्मिती हा उददेश असल्याने त्यांचे स्वत:च्या नावे शेतजमीन असण्याची आवश्यकता नाही.

1) सदर योजनेंतर्गत लाभ घेताना लाभार्थ्यांनी यापूर्वी सदर घटकाचा लाभ घेतलेला नसलेबाबत स्वयंघोषणापत्र सादर करावे.
2) एकदा संबंधित योजनेतील एखाद्या घटकाचा लाभ घेतल्यास पुढील पाच वर्ष त्याच लाभार्थ्यास या योजनेतील त्याच घटकाचा लाभ देय होणार नाही.

अर्ज करा

4   योजनेचे नांव - शेतकऱ्यांना/ बचतगटांना/ ग्रामसंघांना विविध सिंचन साहित्याचा पुरवठा करणे

लाभार्थी अर्ज स्विकारतांना शेतक-यांच्या स्वत:चे नावे असलेल्या शेती क्षेत्राचे 7/12 किंवा 8-अ उतारा, लाभार्थी अ.जा./अ.ज. प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचे वैध जात प्रमाणपत्राची प्रत, आधारकार्ड व आधारकार्ड संलग्न बँक पासबुक छायांकित प्रत सादर करणे बंधनकारक आहे. योजनेची द्विरुक्ती टाळण्यासाठी संबंधित शेतक-याने यापूर्वी सदर घटकाचा लाभ न घेतल्याबाबतचे राज्य कृषि विभागाच्या सहाय्यक कृषि अधिकारी यांचे ना-हरकत प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.
सिंचन साहित्यामध्ये डिझेल इंजिन,पेट्रो-डिझेल पंपसंच,पेट्रोल पंपसंच, विद्युत पंपंसंच,HDPE पाईप,PVC पाईप, 2 HP, 3HP सिंगल फेज, थ्री फेज इलेक्ट्रीक मोटर व 5 HP व 7.5 HP थ्री फेज इलेकट्रीक मोटर या सिंचन साहित्याचा समावेश राहिल. यामध्ये लाभार्थ्यांना रु.30,000/- अनुदान मर्यादेच्या अधिन राहून सर्व बाबी किंवा एक बाब खरेदी करण्याचे स्वातंत्र्य राहिल. सदरचे साहित्य खरेदी करतांना ISI/BEE lable असलेले कमीत कमी 4 Star रेटींग असलेले साहित्य खरेदी करणे आवश्यक आहे.

शेतात लागवड होणा-या पिकांकरिता संरक्षित पाण्याची आवश्यकता असते तसेच मोकाट पाणी देण्यामुळे पाण्याचा होणारा अपव्यय टाळणे. जमिनीचा पोत सांभाळणे. त्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होते. म्हणूनच शेतक-यांना अनुदानाने डिझेल/ पेट्रोडिझेल/ विद्युत/सौर, पंपसंच इ. तसेच HDPE, PVC पाईप उपलब्ध करुन देणे.

सदर योजनेचा लाभ शेतकरी, शेतमजूर, बचतगट, आत्माअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या यांना देय राहील. शेतमजूर, बचतगट, आत्मा अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी यांचे बाबतीत रोजगार निर्मिती हा उददेश असल्याने त्यांचे स्वत:च्या नावे शेतजमीन असण्याची आवश्यकता नाही.

1) सदर योजनेंतर्गत लाभ घेताना लाभार्थ्यांनी यापूर्वी सदर घटकाचा लाभ घेतलेला नसलेबाबत स्वयंघोषणापत्र सादर करावे.
2)एकदा संबंधित योजनेतील एखाद्या घटकाचा लाभ घेतल्यास पुढील पाच वर्ष त्याच लाभार्थ्यास या योजनेतील त्याच घटकाचा लाभ देय होणार नाही.

अर्ज करा

5   योजनेचे नांव - शेतकरी / शेतमजुर/ बचतगट यांना पिक संरक्षण औजारे पुरवठा करणे

लाभार्थी अर्ज स्विकारतांना शेतक-यांच्या स्वत:चे नावे असलेल्या शेती क्षेत्राचे 7/12 किंवा 8-अ उतारा, लाभार्थी अ.जा./अ.ज. प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचे वैध जात प्रमाणपत्राची प्रत, आधारकार्ड व आधारकार्ड संलग्न बँक पासबुक छायांकित प्रत व औजार/साहित्याचा टेस्ट रिपोर्ट व अधिकृत साहित्य विक्रेत्याचे कोटेशन अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे. योजनेची द्विरुक्ती टाळण्यासाठी संबंधित शेतक-याने यापूर्वी सदर घटकाचा लाभ न घेतल्याबाबतचे राज्य कृषि विभागाच्या सहाय्यक कृषि अधिकारी यांचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. शेतक-यांना गुणवत्तापूर्ण यंत्र/औजारांचा पुरवठा व्हावा म्हणून शेतक-यांनी केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम संस्थांनी ज्या कृषि यंत्र/औजारांची रितसर परिक्षण (Testing) करुन ते BIS अथवा सक्षम संस्थानी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार (Standards/Specification) असल्याचे प्रमाणित केले असेल अशाच यंत्र/औजारांना कृषि अधिकारी, पंचायत समिती यांनी पूर्वसंमती प्रदान करावी.
पिक संरक्षण साहित्यामध्ये सर्व प्रकारचे फवारणी पंप/स्प्रेपंप, डस्टर, फेरोमेनट्रॅप, चिकट/रक्षक सापळे व काम गंध सापळे यांचा समावेश राहील.

शेतात लागवड होणा-या पिकांवर निरनिराळ्या किडरोगांचा प्रार्दुभाव होतो. मात्र किटकनाशक फवारणी करिता स्प्रेपंप नसल्याने शेतकरी फवारणी करु शकत नाहीत. त्यासाठी शेतक-यांना तसेच बचतगटांना किटकनाशक फवारणी व किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनुदानाने फवारणी पंप व इतर पिक संरक्षण साहित्य खरेदीवर डीबीटी तत्वानुसार अनुदान उपलब्ध करुन देणे.

सदर योजनेचा लाभ शेतकरी, शेतमजूर, बचतगट, आत्माअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या यांना देय राहील. शेतमजूर, बचतगट, आत्मा अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी यांचे बाबतीत रोजगार निर्मिती हा उददेश असल्याने त्यांचे स्वत:च्या नावे शेतजमीन असण्याची आवश्यकता नाही.

1) सदर योजनेंतर्गत लाभ घेताना लाभार्थ्यांनी यापूर्वी सदर घटकाचा लाभ घेतलेला नसलेबाबत स्वयंघोषणापत्र सादर करावे.
2) एकदा संबंधित योजनेतील एखाद्या घटकाचा लाभ घेतल्यास पुढील पाच वर्ष त्याच लाभार्थ्यास या योजनेतील त्याच घटकाचा लाभ देय होणार नाही.

अर्ज करा

6   योजनेचे नांव - शेतकरी / शेतमजुर/ बचतगट यांना सौर ऊर्जवर आधारीत साहित्याचा पुरवठा करणे

लाभार्थी अर्ज स्विकारतांना शेतक-यांच्या स्वत:चे नावे असलेल्या शेती क्षेत्राचे 7/12 किंवा 8-अ उतारा, लाभार्थी अ.जा./अ.ज. प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचे वैध जात प्रमाणपत्राची प्रत, आधारकार्ड व आधारकार्ड संलग्न बँक पासबुक छायांकित प्रत व साहित्याचा टेस्ट रिपोर्ट व अधिकृत साहित्य विक्रेत्याचे कोटेशन अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे. योजनेची द्विरुक्ती टाळण्यासाठी संबंधित शेतक-याने यापूर्वी सदर घटकाचा लाभ न घेतल्याबाबतचे संबंधित विभागाचे महावितरण अधिकारी यांचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. शेतक-यांना गुणवत्तापूर्ण साहित्याचा पुरवठा व्हावा म्हणून शेतक-यांनी केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम संस्थांनी ज्या कृषि साहित्याची रितसर परिक्षण (Testing) करुन ते BIS अथवा सक्षम संस्थानी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार (Standards/ Specification) असल्याचे प्रमाणित केले असेल अशाच साहित्यांना कृषि अधिकारी, पंचायत समिती यांनी पूर्वसंमती प्रदान करावी.सौर उर्जेवर चालणारी शेतीची विविध औजारे, सोलर ट्रॅप व सौर कृषि पंपसंच या सौर ऊर्जा साधनांवर अनुदान देय राहील.

सौर उर्जेवर आधारित साहित्याच्या वापराद्वारे विजेच्या अनुपलब्धतेच्या समस्येवर मात करणे आणि अपारंपारीक उर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देणे.

सदर योजनेचा लाभ शेतकरी, शेतमजुर, बचतगट, आत्मा अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या यांना देय राहील. शेतमजुर, बचतगट, आत्मा अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या यांचेबाबत रोजगार निर्मिती हा उद्देश असल्याने त्यांचे स्वत:चे नावे शेतजमिन असण्याची आवश्यकता नाही.

1) सदर योजनेंतर्गत लाभ घेताना लाभार्थ्यांनी यापूर्वी सदर घटकाचा लाभ घेतलेला नसलेबाबत स्वयंघोषणापत्र सादर करावे.
2) एकदा संबंधित योजनेतील एखाद्या घटकाचा लाभ घेतल्यास पुढील पाच वर्ष त्याच लाभार्थ्यास या योजनेतील त्याच घटकाचा लाभ देय होणार नाही.

अर्ज करा

7   योजनेचे नांव - पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजनेंतर्गत भाजीपाला विक्रीसाठी साहित्य व ई-कार्ट पुरविणे

सदर योजनेंतर्गत ई-कार्ट चा टेस्ट रिपोर्ट व अधिकृत साहित्य विक्रेत्याचे कोटेशन अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे. योजनेची द्विरुक्ती टाळण्यासाठी संबंधित शेतक-याने यापूर्वी सदर घटकाचा लाभ न घेतल्याबाबतचे राज्य कृषि विभागाच्या सहाय्यक कृषि अधिकारी यांचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. शेतक-यांना गुणवत्तापूर्ण ई-कार्ट वाहनाचा पुरवठा व्हावा म्हणून शेतक-यांनी केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम संस्थांनी ज्या वाहनाचे रितसर परिक्षण (Testing) करुन ते BIS अथवा सक्षम संस्थानी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार (Standards/Specification) असल्याचे प्रमाणित केले असेल अशाच साहित्यांना कृषि अधिकारी, पंचायत समिती यांनी पूर्वसंमती प्रदान करावी. पूर्वसंमती प्रदान करण्याच्या वेळी संबंधित बचतगटांने त्यांचा व्यावसायिक आराखडा सादर करणे आवश्यक राहील. सदर योजनेंतर्गत प्लॅस्टीक क्रेटस - 5नग (क्षमता10 Kg.) व 5 नग - (क्षमता 5Kg.), लोखंडी स्टॅण्ड (33X 46 इंच व पायरीची लांबी 12 x रुंदी 46 इंच) व छत्री (जिल्हा परिषद कृषि विभागाचा लोगो प्रिंटींगसह) (7 x 7 फुट), खुर्ची, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा इत्यादींचा संच प्रति लाभार्थी एकूण खर्चाच्या 90% किंवा जास्तीत जास्त र.रु.9,000/- मर्यादेत अनुदान देय राहील.
ई- कार्ट खरेदी करणा-या बचतगटास/ग्रामसंघांना प्रति ई-कार्ट खरेदी किंमतीच्या 90% किंवा र.रु.3,07,296/- यापैकी जे कमी असेल ते एवढे अनुदान देय राहील. अनुदानाची शिफारस करतांना जीएसटी रकमेसह खरेदीच्या रकमेवर परिगणना करणेत यावी. यासाठी जिल्हास्तरीय खरेदी समितीने निश्चित केलेले दर ग्राह्य धरणेत यावे.

भाजीपाला व शेतमाल नाशिवंत व नाजूक कृषि माल असलेने त्याची योग्य हाताळणी होणे आवश्यक आहे. भाजीपाला विक्री करताना हाताळणीसाठी प्लॅस्टीक क्रेट्स दिल्यास भाजीपाल्याची तात्पुरती साठवणूक व वाहतुक करणे शास्त्रीय दृष्ट्या योग्य ठरेल. तसेच भाजीपाला व शेतमालाची पध्दतशीर मांडणी करण्यासाठी लोखंडी स्टॅण्ड दिल्यास ग्राहक आकर्षित होऊन शेतक-यांचा उत्पन्नात वाढ करणे तसेच ई-कार्ट (Electric Vehicle) असल्यामुळे इंधनाची बचत होते. शेतक-याने स्वत:चा शेतमाल आठवडी बाजार तसेच निवासी संकुल येथे जाऊन थेट विक्री केल्यामुळे ग्राहकांना माफक दरात ताजा शेतमाल उपलब्ध होईल. तसेच शेतकरी आत्मनिर्भर होईल. हा या योजनेचा उद्देश आहे.

सदर योजनेचा लाभ(भाजीपाला विक्री साहित्य) शेतकरी, शेतमजूर, नोंदणीकृत बचतगट, ग्रामसंघ, आत्माअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या यांना देय राहील. ई-कार्ट खरेदीबाबत नोंदणीकृत बचतगट /ग्रामसंघ/ आत्माअंतर्गत शेतकरी उत्पादक गट/ कंपन्या यांना देय राहील.

1) Electric Vehicle खरेदी करणा-यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडे Electric Vehicle चा विमा व नोंदणी करणे आवश्यक राहिल.
2) एकदा संबंधित योजनेचा लाभ घेतल्यास पुढील पाच वर्ष त्याच बचतगटांस या योजनेचा लाभ देय होणार नाही.

अर्ज करा

8   योजनेचे नांव - सेंद्रीय पध्दतीने भाजीपाला लागवड (गांडुळ खत युनिट)

सदर योजनेंतर्गत शेतक-याकडे किमान 10 गुंठे व एका गटाकडे 10 हेक्टर क्षेत्र असावे. वैयक्तिक शेतकरी व नोंदणीकृत शेतकरी गट यांना 3 युनिट पैकी कोणत्याही 1 युनिटची उभारणी करुन लाभ घेता येईल. लाभार्थी अर्ज स्विकारतांना शेतक-यांच्या स्वत:चे नावे असलेल्या शेती क्षेत्राचे 7/12 किंवा 8-अ उतारा, लाभार्थी अ.जा./अ.ज. प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचे वैध जात प्रमाणपत्राची प्रत, आधारकार्ड व आधारकार्ड संलग्न बँक पासबुक छायांकित प्रत, गांडुळ खत बेडचे BIS प्रमाणपत्र व अधिकृत साहित्य विक्रेत्याचे कोटेशन अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे. जर शेतकरी स्वत: गांडुळ खत युनिटचे बांधकाम करणार असेल ता त्याने कामाचे अंदाजपत्रक सोबत जोडावे. योजनेची द्विरुक्ती टाळण्यासाठी संबंधित शेतक-याने यापूर्वी सदर घटकाचा लाभ न घेतल्याबाबतचे राज्य कृषि विभागाच्या सहाय्यक कृषि अधिकारी यांचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. शेतक-यांना गुणवत्तापूर्ण रेडिमेड गांडुळ खत युनिटचा/बेडचा पुरवठा व्हावा म्हणून शेतक-यांनी BIS अथवा सक्षम संस्थानी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार (Standards/Specification) व अंदाजपत्रकानुसार असल्याचे प्रमाणित केले असेल अशाच गांडुळ खत युनिटला कृषि अधिकारी, पंचायत समिती यांनी पूर्वसंमती प्रदान करावी.

सेंद्रीय शेती पध्दतीमध्ये निसर्ग संवर्धन करणे, पिक उत्पादनाचा खर्च कमी करणे, रासायनिक खते, किटकनाशके, तणनाशके व संप्रेरके या सारख्या घातक रसायनांना पर्यायी अशा सेंद्रीय व जैविक निविष्ठांचा वापर वाढविणे. नैसर्गिक घटकांना हानी न पोहोचविता त्यांचा योग्य वापर करुन शेती करणे. जमिनीची सुपिकता वाढविणे व ती दिर्घकाळ टिकवणे. स्थानिक स्त्रोताचा पुर्नवापर शेतीमध्ये करणे. शेतीचा उत्पादन खर्च कमी करुन शेतक-यांच्या निव्वळ उत्पन्नात वाढ करणे.

सदर योजनेचा लाभ अत्यल्प व अल्प भुधारक शेतक-यांना, अनु.जाती, अनु.जमाती, महिला दिव्यांग व इतर शेतकरी व नोंदणीकृत शेतकरी गट या प्राधान्यक्रमाने निवड करुन लाभ देण्यांत यावा.

अर्ज करा