जिल्हा परिषद ठाणे (☎ 9111571112)
समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती    ( नोंदणीसाठी येथे क्लिक करा )


योजनेबद्दल माहिती

1   योजनेचे नांव - मागास्वर्गीयाना नवीन घर बांधणीसाठी अथवा कच्च्या घराची सुधारणा करण्यासाठी अर्थ सहाय्य योजना

1) सन 2024-25 या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या अर्जापैकी पात्र लाभार्थ्याना सन 2025-26 लाभ प्रथम देण्यात येईल.
2) लाभार्थी हा मागासवर्गीय असावा ( अनु.जाती /जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती )
3) लाभार्थ्यांच्या जातीचा दाखला सक्षम अधिका-यानेदिलेला जोडणेत यावा.
4) लाभार्थ्यांचा अथवा त्याच्या कुटुंबाचे दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नाव असल्यास दा.रे.दाखला अथवा रु.1,00,000/- च्या आत उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला दाखला जोडणेत यावा.
5) लाभार्थ्यांच्या नावाने घर असावे व नमुना नंबर 8 अर्जासोबत जोडणेत यावा.
6) अर्जासोबत आधारकार्ड व रेशनकार्ड छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
7) उपअभियंता यांचे अंदाजपत्रक जोडणेत यावे.
8) लाभार्थ्यांचे अर्ज ग्रामपंचायत/पंचायत समितीच्या शिफारशीसह समाज कल्याण विभागास सादर करावेत. 9) लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती/ठराव समितीस राहिल.
10) सदरचा लाभ रु.40,000/- च्या मर्यादेपर्यंत राहील.
11) अर्ज सादर करावायाच्या दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त झाल्यास तसेच अर्जासोबत परिपुर्ण कागदपत्रे न जोडल्यास सदरच्या अर्जाचा मंजूरीसाठी विचार केला जाणार नाही.
12) गटस्तरावरुन तसेच समाज कल्याण विभाग, जि.प.ठाणे स्तरावर प्रस्ताव मागवुन लाभार्थ्यांची निवड करुन त्यांना लाभ दिला जाईल व गट स्तरावरुन लाभार्थीने केलेल्या कामाच्या मुल्यांकनाप्रमाणे लाभार्थीच्या आधारकार्ड संलग्न बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येईल.
13) सदरची योजना उपलब्ध निधीच्या प्रमाणात राबविली जाईल.

अर्ज करा

2   योजनेचे नांव - २०% जिल्हा परिषद सेस फंड अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे (एकवेळ) या योजनेचा विद्यार्थ्यांना लाभ मिळणेबाबत

1) विद्यार्थी हा मागासवर्गीयांपैकी अनु.जाती / अनु.जमाती/ विजाभज या संवर्गाचा असावा.
2) विद्यार्थ्याचा जातीचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला जोडणेत यावा.
3) विद्यार्थी हा शिक्षण घेत असावा. इयत्ता 12 वी पास व त्यापुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असावा व बोनाफाईड जोडणे आवश्यक.
4) विद्यार्थ्यांचा कुटुंबाचा दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नाव असल्यास दा.रे.दाखला अथवा रु.1,00,000/- च्या आत उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला दाखला जोडणेत यावा.
5) विद्यार्थ्यांचे वैयक्तिक बँक पासबुक,आधारकार्ड व रेशनकार्ड छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
6) विद्यार्थ्यांचे अर्ज ग्रामपंचायत/पंचायत समितीच्या शिफारशीसह समाज कल्याण विभागास सादर करावेत.
7) विद्यार्थी निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती/ ठराव समितीस राहील.
8) अर्ज सादर करावायाच्या दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त झाल्यास तसेच अर्जासोबत परिपुर्ण कागदपत्रे न जोडल्यास सदरच्या अर्जाचा मंजूरीसाठी विचार केला जाणार नाही.
9) गटस्तरावरुन प्रस्ताव मागवुन विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना अनुक्रमे
अ) 12 वी ते बी.ए.पर्यंत शिक्षणास आर्थिक सहाय्य रु.10,000/- प्रति विद्यार्थी.
ब) 12 वी पास नंतर व्यवसायिक शिक्षण (कोर्स) व इतर शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य रु. 20,000/- प्रति विद्यार्थी.
क) अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य रु.40,000/- प्रति विद्यार्थी.
ड) वैद्यकिय अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य रु.45,000/- प्रति विद्यार्थी .
10) दिनांक 05.12.2016 रोजीच्या नियोजन विभागाकडील शासन निर्णयान्वये पात्र लाभार्थ्यांना द्यावयाचे अनुदान जिल्हा परिषद स्तरावरून वित्तप्रेषणाद्यारे गट स्तरावर वितरीत करण्यात येईल व गट सतरावरुन मंजूर विद्यार्थी/लाभार्थ्यांच्या आधार निगडीत बँक खात्यात डि.बी.टी.मार्फत थेट अनुदान जमा करण्यात येईल.
11) सदरची योजना उपलब्ध निधीच्या प्रमाणात राबविली जाईल.

अर्ज करा

3   योजनेचे नांव - ५% दिव्यांग कल्याण सेस फंड अंतर्गत दिव्यांग-दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी प्रोत्साहन देणे व राहणीमनचा दर्जा उंचावणे, आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविणे या योजनेचा लाभ मिळणेबाबत अर्ज

1) दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सक जोडणे आवश्यक.
2) अस्थिव्यंग 40 टक्के पेक्षा जास्त.
3) कर्णबधिर 60 डी.बी. पेक्षा जास्त.
4) अंध 20/200, 6/60 स्लेगन दृष्टी तीक्ष्णता
5) मंतिमंद आय क्यू.70 पेक्षा कमी, पालकांचे हमी पत्र घेण्यात येऊ नये.
6) दोन्ही लाभार्थी दिव्यांग असावेत.
7) विवाह नोंदणी दाखला असावा.
8) बँकेचे नांव / बँक खाते क्रमांक / बँक IFC कोड क्रमांक (बँक राष्ट्रीयकृत असावी)
9) लाभार्थ्यांचा दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नंबर असल्यास दा.रे.दाखला अथवा रु.1,00,000/- च्या आत उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला दाखला जोडणेत यावा.
10) लाभार्थी स्थानिक असावा व तसा दाखला ग्रामसेवक/सरपंच यांचा आवश्यक.
11) लाभार्थ्यांस यापूर्वी लाभ दिलेला नसावा.
12) लाभार्थ्यांचे अर्ज ग्रामपंचायत/पंचायत समिती यांचे शिफारशीसह समाज कल्याण विभागात सादर करावेत.
13) लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती/ ठराव समितीस राहील.
14) प्राप्त प्रस्तावामधुन लाभार्थ्यांची निवड समाज कल्याण समिती / ठराव समिती सभेमध्ये करण्यात येईल.
15) ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णय दिनांक 28/04/2016 नुसार शासन निर्णयान्वये पात्र लाभार्थ्यांना द्यावयाचे अनुदान जिल्हा परिषद स्तरावरून वित्तप्रेषणाद्यारे गट स्तरावर वितरीत करण्यात येईल व गट सतरावरुन मंजूर लाभार्थ्यांच्या आधार निगडीत बँक खात्यात डि.बी.टी.मार्फत थेट अनुदान जमा करण्यात येईल.
16) सदरची योजना उपलब्ध निधीच्या प्रमाणात राबविली जाईल.

अर्ज करा

4   योजनेचे नांव - ५% दिव्यांग कल्याण सेस फंड अंतर्गत दिव्यांग पालकांच्या मुलींना "माझी लेक" योजनेअंतर्गत रु. ५०,०००/- मुदतठेव रक्कम ठेवणे या योजनेचा लाभ मिळणेबाबत अर्ज

1) पालकांचे दिव्यांगत्व 40% च्या वा असावे व तसा दिव्यांग प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
2) लाभार्थी कुटुंबाचे दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नाव असल्यास दा.रे.दाखला अथवा रु.1,00,000/- च्या आत उत्पन्नाचा सक्षम अधिका-याने दिलेला दाखला जोडणेत यावा.
3) अर्जासोबत आधारकार्ड व रेशनकार्ड छायांकित प्रत जोडणे आवश्यक.
4) दि.1 जानेवारी 2020 नंतर जन्मास आलेल्या मुलींना लाभ देता येईल.
5) लाभार्थी अर्ज ग्रामपंचायत /पंचायत समिती यांच्या शिफारशीसह समाज कल्याण विभागाकडे सादर करावेत.
6) लाभार्थी अंतिम निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती/ठराव समितीस राहील.
7) कुटुंबात अपत्य संख्या दोन असावी व तसा सरपंच /प्रशासक व ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी यांचा दाखला जोडणेत यावा.
8) एका मुलीसाठी रुपये 50000/-व दोन मुली असल्यास प्रत्येकी रुपये 25000/- प्रमाणे रक्कमेचे मुदत ठेव काढणेत येईल.
9) मुलींचे 18 वर्ष पुर्ण झाल्यानंतर मुदत ठेवीची रक्कम काढणेत यावी.
10) प्रस्ताव समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद,ठाणे यांच्याकडे ग्रामपंचायत व पंचायत समिती शिफारशीसह प्राप्त होणे आवश्यक.
11) प्रस्तावाची छाननी करुन परिपुर्ण प्रस्ताव समाज कल्याण समिती/ठराव समिती यांचे मंजूरीसाठी ठेवणेत येतील व मंजूर झालेल्या गुणवंतास या योजनेचा लाभ देण्यात येईल.
12) ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णय दिनांक 28/04/2016 नुसार शासन निर्णयान्वये पात्र लाभार्थ्यांना द्यावयाचे अनुदान जिल्हा परिषद स्तरावरून वित्तप्रेषणाद्यारे गट स्तरावर वितरीत करण्यात येईल व गट सतरावरुन मंजूर विद्यार्थी/लाभार्थ्यांच्या आधार निगडीत बँक खात्यात डि.बी.टी.मार्फत थेट अनुदान जमा करण्यात येईल.
13) सदरची योजना उपलब्ध निधीच्या प्रमाणात राबविली जाईल.

अर्ज करा

5   योजनेचे नांव - ५% दिव्यांग कल्याण सेस फंड अंतर्गत दिव्यांग लाभर्थ्यांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे या योजनेसाठी अर्ज

1) सन 2024-25 या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या अर्जापैकी पात्र लाभार्थ्याना सन 2025-26 लाभ प्रथम देण्यात येईल.
2) लाभार्थी दिव्यांग असलेबाबतचे ऑनलाईन सक्षम अधिका-याचे वैद्यकिय प्रमाणपत्र (अपंगत्व कमीत कमी 40%) असावे. तसेच मतिमंद लाभार्थ्यांस सदर योजनेचा लाभ देता येणार नाही.
3) लाभार्थ्यांचा दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नंबर असल्यास दा.रे.दाखला अथवा रु.1,00,000/- च्या आत उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला दाखला जोडणेत यावा.
4) लाभार्थी गरजू व पात्र तसेच सद्यस्थितीत बेरोजगार असलेबाबतचा ग्रामपंचायतीचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
5) लाभार्थ्याकडे विजेची जोडणी असणे आवश्यक आहे.विद्युत बिल जोडणे आवश्यक.
6) सदर योजनेचे प्रस्ताव अर्ज ग्रामपंचायत/पंचायत समितीच्या शिफारशीसह समाज कल्याण विभागास सादर करावेत.
7) वैयक्तिक लाभार्थ्याचे बँक तपशिलासोबत बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC Code, बँक शाखा व पत्ता, सोबत पॅनकार्ड नंबर व आधारकार्ड नंबर अर्जात नमुद करणे आवश्यक असून अर्जासोबत त्याच्या छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
8) अर्जासोबत निवड केलेल्या व्यवसायाचे दरपत्रक जोडणे आवश्यक आहे.
9) सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर वस्तू / साहित्याची खरेदी न करता त्याकरिता निश्चित करण्यात आलेल्या रक्कमेचे अनुदान लाभार्थ्याच्या खात्यावर करण्यात येईल.
10) दिव्यांग लाभार्थी वास्तव्यास असलेल्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकाने दिव्यांग लाभार्थ्यास दिलेल्या लाभाबाबतचा अहवाल (खरेदीच्या पावतीसह) तसेच उपयोगिता प्रमाणपत्र समाज कल्याण विभागास सादर करावा.
11) सदर योजनेच्या प्राप्त प्रस्तावाची अंतिम निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती/ ठराव समितीस राहील.
12) ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णय दिनांक 28/04/2016 नुसार शासन निर्णयान्वये पात्र लाभार्थ्यांना द्यावयाचे अनुदान जिल्हा परिषद स्तरावरून वित्तप्रेषणाद्यारे गट स्तरावर वितरीत करण्यात येईल व गट सतरावरुन मंजूर विद्यार्थी/लाभार्थ्यांच्या आधार निगडीत बँक खात्यात डि.बी.टी.मार्फत थेट अनुदान जमा करण्यात येईल.
13) सदरची योजना उपलब्ध निधीच्या प्रमाणात राबविली जाईल.

अर्ज करा

6   योजनेचे नांव - दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी वाहन ( स्कुटी ) खरेदीसाठी अनुदान देणे योजना

1) सन 2024-25 या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या अर्जापैकी पात्र लाभार्थ्याना सन 2025-26 लाभ प्रथम देण्यात येईल.
2) लाभार्थी अस्थिव्यंग (पायाने) 50% च्या वर असावा व तसा दिव्यांग प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
3) लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नाव असल्यास दा.रे.दाखला अथवा रु.1,00,000/- च्या आत उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला दाखला अर्जासोबत जोडणेत यावा.
4) अर्जासोबत आधारकार्ड व रेशनकार्ड व लाभार्थ्यांचा पुर्ण फोटो जोडणे आवश्यक आहे.
5) लाभार्थ्यांस यापूर्वी लाभ दिलेला नसावा. तसेच स्कुटीचे दरपत्रक जोडणे आवश्यक आहे.
6) लाभार्थ्यांस स्कुटी-ई स्कुटी दुस-यास विकता येणार नाही.
7) लाभार्थ्यांचे अर्ज ग्रामपंचायत/पंचायत समिती यांचे शिफारशीसह समाज कल्याण विभागात सादर करावेत. 8) लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती/ठराव समितीस राहिल.
9) अर्जासोबत पासबुक छायांकित प्रत जोडणे आवश्यक.
10) दिनांक 05.12.2016 रोजीच्या नियोजन विभागाकडील शासन निर्णयान्वये पात्र लाभार्थ्यांच्या आधार निगडीत बँक खात्यात थेट खात्यात अनुदान जमा करण्यात येईल अथवा खेरदी करुन देण्यात येईल.
11) ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णय दिनांक 28/04/2016 नुसार शासन निर्णयान्वये पात्र लाभार्थ्यांना द्यावयाचे अनुदान जिल्हा परिषद स्तरावरून वित्तप्रेषणाद्यारे गट स्तरावर वितरीत करण्यात येईल व गट सतरावरुन मंजूर विद्यार्थी/लाभार्थ्यांच्या आधार निगडीत बँक खात्यात डि.बी.टी.मार्फत थेट अनुदान जमा करण्यात येईल.
12) सदरची योजना उपलब्ध निधीच्या प्रमाणात राबविली जाईल.

अर्ज करा

7   योजनेचे नांव - इ.5 वी ते 9 वी च्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकली पुरविणे.

सन 2024-25 या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या अर्जापैकी पात्र लाभार्थ्याना सन 2025-26 लाभ प्रथम देण्यात येईल.
2) विद्यार्थी हा मागासवर्गीय असावा. (अनु.जाती /जमाती, वि.जा.भ.ज. )
3) विद्यार्थी हा 5 वी ते 9 वी मध्ये शिक्षण घेत असावा,अर्जासोबत शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र जोडणेआवश्यक.
4) विद्यार्थी हा स्थानिक असावा.तसेच घर ते शाळा यामधील अंतर कमीत कमी 2 कि.मी.असणे आवश्यक आहे.तसा मुख्याध्यापक दाखला जोडण्यात यावा .
5) लाभार्थी विद्यार्थ्यांचा किंवा त्यांच्या पालकाचा जातीचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला जोडण्यात यावा.विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नाव असल्यास दा.रे.दाखला अथवा रु.1,00,000/- च्या आत उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला जोडणेत यावा. 6) लाभार्थ्यांचे अर्ज सरपंच / ग्रामसेवक यांचे शिफारशीसह पंचायत समिती शिफारशीसह समाज कल्याण विभागास सादर करावेत.
7) लाभार्थी निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती/ ठराव समितीचा राहिल.
8) अर्जासोबत रेशनकार्डाची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
9) अर्जासोबत बँक पासबुकाची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
10) अर्ज सादर करावायाच्या दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त झाल्यास तसेच अर्जासोबत परिपुर्ण कागदपत्रे न जोडल्यास सदरच्या अर्जाचा मंजूरीसाठी विचार केला जाणार नाही.
11) इतर विभागाकडून या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र.
12) दिनांक 05.12.2016 रोजीच्या नियोजन विभागाकडील शासन निर्णयान्वये पात्र लाभार्थ्यांना द्यावयाचे अनुदान जिल्हा परिषद स्तरावरून वित्तप्रेषणाद्यारे गट स्तरावर वितरीत करण्यात येईल व गट स्तरावरुन मंजूर विद्यार्थी/लाभार्थ्यांच्या आधार निगडीत बँक खात्यात डि.बी.टी.मार्फत थेट अनुदान जमा करण्यात येईल.तसेच विद्यार्थी /लाभार्थी निवड यादीमधील संबंधित लाभार्थी/ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यापूर्वी,संबंधित विद्यार्थ्याने तपशीलानुसार (स्पेसीफीकेशन नुसार) साहित्य खरेदी करेल.खरेदीच्या पावतीवर विक्रेत्याचा GST क्रमांक नमूद असणे आवश्यक . विद्यार्थ्याने खरेदीची मूळ प्रत व स्वयंसाक्षांकीत प्रत अशा दोन प्रतित सादर करावी लागेल. त्यानंतर विद्यार्थ्याने खरेदी केलेल्या साहित्याच्या पावतीची ग्रामसेवकामार्फत शहानिशा करुन आवश्यक त्या बाबींची पूर्तता झाल्याची खात्री पटल्यानंतरच सदर विद्यार्थ्यास रोख रकमेच्या स्वरुपात अनुदान त्यांच्या आधार कार्ड क्रमांकाशी निगडीत बॅक खात्यात जमा करण्यात येईल.
13) सदरची योजना उपलब्ध निधीच्या प्रमाणात राबविली जाईल.

अर्ज करा

8   योजनेचे नांव - मागासवर्गीय लाभार्थ्यांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य देणे व वैयक्तिक लाभार्थी/महिला बचत गट यांना लघुउद्योगासाठी अर्थिक सहाय्य देणे

सन 2024-25 या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या अर्जापैकी पात्र लाभार्थ्याना सन 2025-26 लाभ प्रथम देण्यात येईल.

(अ) स्वयंरोजगारासाठी वैयक्तिक अनुदान.
1) लाभार्थी हा मागासवर्गीयांपैकी अनु.जाती /अनु.जमाती, विजाभज या संवर्गाचा असावा.
2) जातीचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला असावा.
3) किमान 12 वी पास असल्याबाबतचे कागदपत्र जोडणेत यावा.
4) लाभार्थी कुटुंबाचा दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नाव असल्यास दा.रे.दाखला अथवा रु.1,00,000/- च्या आत उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला दाखला जोडणेत यावा. 5) लाभार्थ्यांचे वैयक्तिक बँक पासबुक,आधारकार्ड व रेशनकार्ड छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
6) लाभार्थ्यांने यापुर्वी लाभ घेतला नसावा.
7) लाभार्थी प्रस्ताव अर्ज ग्रामपंचायत/पंचायत समितीच्या शिफारशीसह समाज कल्याण विभागास सादर करावेत.
8) लाभार्थी निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती/ठराव समितीस राहील.
9) अर्ज सादर करावायाच्या दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त झाल्यास तसेच अर्जासोबत परिपुर्ण कागदपत्रे न जोडल्यास सदरच्या अर्जाचा मंजूरीसाठी विचार केला जाणार नाही.
10) अर्जासोबत करणार असलेल्या व्यवसायाचे दरपत्रक जोडणे आवश्यक आहे.
11) दिनांक 05.12.2016 रोजीच्या नियोजन विभागाकडील शासन निर्णयान्वये पात्र लाभार्थ्यांना द्यावयाचे अनुदान जिल्हा परिषद स्तरावरून वित्तप्रेषणाद्यारे गट स्तरावर वितरीत करण्यात येईल व गट सतरावरुन मंजूर विद्यार्थी/लाभार्थ्यांच्या आधार निगडीत बँक खात्यात डि.बी.टी.मार्फत थेट अनुदान जमा करण्यात येईल.तसेच विद्यार्थी /लाभार्थी निवड यादीमधील संबंधित लाभार्थी/ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यापूर्वी,संबंधित विद्यार्थ्याने तपशीलानुसार (स्पेसीफीकेशन नुसार) साहित्य खरेदी करेल.खरेदीच्या पावतीवर विक्रेत्याचा GST क्रमांक नमूद असणे आवश्यक . विद्यार्थ्याने खरेदीची मूळ प्रत व स्वयंसाक्षांकीत प्रत अशा दोन प्रतित सादर करावी लागेल. त्यानंतर विद्यार्थ्याने खरेदी केलेल्या साहित्याच्या पावतीची ग्रामसेवकामार्फत शहानिशा करुन आवश्यक त्या बाबींची पूर्तता झाल्याची खात्री पटल्यानंतरच सदर विद्यार्थ्यास रोख रकमेच्या स्वरुपात अनुदान त्यांच्या आधार कार्ड क्रमांकाशी निगडीत
बॅक खात्यात जमा करण्यात येईल.
(आ) महिला बचत गट
1) महिला बचत गटातील सभासद मागासवर्गीयांपैकी अनु.जाती / अनु.जमाती, विजाभज या संवर्गाचा असावा व किमांन 70% लाभार्थी या संवर्गाचे असावेत.
2) महिला बचत गटाचे बँक पासबुकाची छायांकित जोडणे आवश्यक आहे
3) महिला बचत गटाचे प्रस्ताव ग्रामपंचायत/ पंचायत समितीच्या शिफारशीसह समाज कल्याण विभागास सादर करावेत.
4) महिला बचत गटाची निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती / ठराव समितीस राहील.
5) अर्ज सादर करावायाच्या दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त झाल्यास तसेच अर्जासोबत परिपुर्ण कागदपत्रे न जोडल्यास सदरच्या अर्जाचा मंजूरीसाठी विचार केला जाणार नाही.
6) महिला बचत गट माविम/MSRLM/बँक यापैकी कोणत्याही एका ठिकाणी नोंदणीकृत असावा व तसा तालुका अभियान व्यवस्थापक यांचा दाखला जोडण्यात यावा. संबंधित दाखल्यामध्ये गटातील सर्व महिलांचा प्रवर्ग नमुद करणेत यावा.
7) गटस्तरावरुन प्राप्त प्रस्तावामधुन वैयक्तिक लाभांसाठी लाभार्थी व महिला बचत गटाची निवड समाज कल्याण समिती / ठराव समिती सभेमध्ये करण्यात येईल .
अर्जासोबत करणार असलेल्या व्यवसायाचे दरपत्रक जोडणे आवश्यक आहे.
8) दिनांक 05.12.2016 रोजीच्या नियोजन विभागाकडील शासन निर्णयान्वये पात्र लाभार्थ्यांना द्यावयाचे अनुदान जिल्हा परिषद स्तरावरून वित्तप्रेषणाद्यारे गट स्तरावर वितरीत करण्यात येईल व गट स्‍तरावरुन महिला बचत गटास थेट समुहाच्या बँक खात्यात लाभाची रक्कम थेट जमा करण्यात येईल.
9) सदरची योजना उपलब्ध निधीच्या प्रमाणात राबविली जाईल.

अर्ज करा

9   योजनेचे नांव - मागासवर्गीय लाभार्थ्यांना छताकरिता पत्रे पुरविणे व स्टॉलसाहित्यासाठी मदत करणे

1) सन 2024-25 या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या अर्जापैकी पात्र लाभार्थ्याना सन 2025-26 लाभ प्रथम देण्यात येईल.
2)लाभार्थी हा मागासवर्गीय असावा. (अनु.जाती/जमाती / विजाभज) 3) लाभार्थ्यांचा जातीचा दाखला सक्षम अधिका-याचा असावा
4)लाभार्थ्यांचा दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नंबर असल्यास दा.रे.दाखला अथवा रु.1,00,000/- च्या आत उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला दाखला जोडणेत यावा. 5) लाभार्थ्यांने यापुर्वी योजनेचा लाभ घेतला नाही याबाबत ग्रामसेवक / सरपंच यांचा दाखला.
6) लाभार्थ्यांचा घर नमुना क्र.8 जोडणे आवश्यक आहे.
7) लाभार्थी स्थानिक असावा व बँक खात्याची,आधारकार्ड व रेशनकार्ड छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
8) सदर योजनेचे प्रस्ताव अर्ज ग्रामपंचायत/पंचायत समितीच्या शिफारशीसह समाज कल्याण विभागास सादर करावेत.
9) लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती/ठराव समितीस राहील.
11) किरकोळ व्यवसाय करणा-या लाभार्थ्यांना व्यवसायाचे साहित्य/वस्तू विक्रीसाठी पुरविण्यात आलेले स्टॉल दुस-यास विकता येणार नाही.
12) सरपंच/ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांनी स्टॉल ठेवण्यासाठी जागेचा नाहरकत दाखला आवश्यक.
13) दिनांक 05.12.2016 रोजीच्या नियोजन विभागाकडील शासन निर्णयान्वये पात्र लाभार्थ्यांना द्यावयाचे अनुदान जिल्हा परिषद स्तरावरून वित्तप्रेषणाद्यारे गट स्तरावर वितरीत करण्यात येईल व गट सतरावरुन मंजूर लाभार्थ्यांच्या आधार निगडीत बँक खात्यात डि.बी.टी.मार्फत थेट अनुदान जमा करण्यात येईल.तसेच लाभार्थी निवड यादीमधील संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यापूर्वी,संबंधित विद्यार्थ्याने तपशीलानुसार (स्पेसीफीकेशन नुसार) साहित्य खरेदी करेल.खरेदीच्या पावतीवर विक्रेत्याचा GST क्रमांक नमूद असणे आवश्यक . विद्यार्थ्याने खरेदीची मूळ प्रत व स्वयंसाक्षांकीत प्रत अशा दोन प्रतित सादर करावी लागेल. त्यानंतर विद्यार्थ्याने खरेदी केलेल्या साहित्याच्या पावतीची ग्रामसेवकामार्फत शहानिशा करुन आवश्यक त्या बाबींची पूर्तता झाल्याची खात्री पटल्यानंतरच सदर विद्यार्थ्यास रोख रकमेच्या स्वरुपात अनुदान त्यांच्या आधार कार्ड क्रमांकाशी निगडीत बॅक खात्यात जमा करण्यात येईल.
14) सदरची योजना उपलब्ध निधीच्या प्रमाणात राबविली जाईल.

अर्ज करा

10   योजनेचे नांव - मागासवर्गीय विद्यार्थ्यांना MSCIT संगणक / टंकलेखन (मराठी/इंग्रजी) प्रशिक्षण पुर्ण केल्यावर फी प्रतीपुर्ती करणे

1) विद्यार्थी हा मागासवर्गीय असावा. (अनु.जाती / अनु.जमाती, विजाभज)
2) विद्यार्थ्यांच्या जातीचा दाखला सक्षम अधिका-याचा असावा. लाभार्थ्यांचा दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नंबर असल्यास दा.रे.दाखला अथवा रु.1,00,000/- च्या आत उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला दाखला जोडणेत यावा.
3) विद्यार्थ्यांने अर्जासोबत बँक खात्याची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
4) संगणक प्रशिक्षण देणारी संस्था नोंदणीकृत व शासनमान्य असणे आवश्यक आहे.
5) प्रवेशित विद्यार्थी MSCIT परिक्षा पास झाल्याशिवाय अनुदान देता येणार नाही.अर्जासोबत शुल्क फी पावती व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
6) विद्यार्थी किमान इयत्ता 10 वी परिक्षा उत्तीर्ण असावा व प्रमाणपत्राची छायांकित प्रत जोडावी.
7) उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांचे बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल.
8) विद्यार्थी स्थानिक असल्याचा सरपंच / ग्रामसेवक यांचा दाखला. 9) विद्यार्थ्यांचे अर्ज ग्रामपंचायत/पंचायत समितीच्या शिफारशीसह समाज कल्याण विभागास सादर करावेत. 10) विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती / ठराव समितीस राहिल.
11) अर्ज सादर करावायाच्या दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त झाल्यास तसेच अर्जासोबत परिपुर्ण कागदपत्रे न जोडल्यास सदरच्या अर्जाचा मंजूरीसाठी विचार केला जाणार नाही.
12) शासन मान्य संस्थाकडुन प्रस्ताव मागवुन मागासवर्गीय प्रशिक्षणार्थीची निवड समाज कल्याण समिती / ठराव समिती सभेमध्ये करण्यात येईल.
13) दिनांक 05.12.2016 रोजीच्या नियोजन विभागाकडील शासन निर्णयान्वये पात्र लाभार्थ्यांना द्यावयाचे अनुदान जिल्हा परिषद स्तरावरून वित्तप्रेषणाद्यारे गट स्तरावर वितरीत करण्यात येईल व गट सतरावरुन मंजूर विद्यार्थ्यांच्या आधार निगडीत बँक खात्यात डि.बी.टी.मार्फत थेट अनुदान जमा करण्यात येईल.
14) सदरची योजना उपलब्ध निधीच्या प्रमाणात राबविली जाईल.

अर्ज करा

11   योजनेचे नांव - उच्च व तांत्रिक शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्याना विशेष शिष्यवृत्ती देणे

1) विद्यार्थ्याचे दिव्यांगत्व 40% च्या वर असावे व तसे दिव्यांग प्रमाणपत्र जोडणेत यावे.
2) विद्यार्थी हा शिक्षण घेत असावा. इयत्ता 12 वी पास नंतर व त्यापुढील उच्च व तांत्रिक शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असावा व बोनाफाईड जोडणे आवश्यक.
3) विद्यार्थ्यांचा कुटुंबाचा दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नाव असल्यास दा.रे.दाखला अथवा रु.1,00,000/- च्या आत उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला दाखला जोडणेत यावा. 4) विद्यार्थ्यांचे वैयक्तिक बँक पासबुक,आधारकार्ड व कुटुंबाचे रेशनकार्ड छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
5) विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण संस्थेच्या प्राचार्याच्या शिफारशीसह समाज कल्याण विभागाकडे सादर करणेत यावेत. 6) विद्यार्थी निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती/ ठराव समितीस राहील.
7) अर्ज सादर करावायाच्या दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त झाल्यास तसेच अर्जासोबत परिपुर्ण कागदपत्रे न जोडल्यास सदरच्या अर्जाचा मंजूरीसाठी विचार केला जाणार नाही.
8) पात्र परिपुर्ण प्रस्तावातील मागवुन विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना अनुक्रमे
अ) 12 वी ते बी.ए.पर्यंत शिक्षणास आर्थिक सहाय्य रु.10,000/- प्रति विद्यार्थी.
ब) 12 वी पास नंतर व्यवसायिक शिक्षण (कोर्स) व इतर शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य रु. 20,000/- प्रति विद्यार्थी.
क) अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य रु.40,000/- प्रति विद्यार्थी.
ड) वैद्यकिय अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य रु.45,000/- प्रति विद्यार्थी
9) ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णय दिनांक 28/04/2016 नुसार शासन निर्णयान्वये पात्र लाभार्थ्यांना द्यावयाचे अनुदान जिल्हा परिषद स्तरावरून वित्तप्रेषणाद्यारे गट स्तरावर वितरीत करण्यात येईल व गट सतरावरुन मंजूर विद्यार्थ्यांच्या आधार निगडीत बँक खात्यात डि.बी.टी.मार्फत थेट अनुदान जमा करण्यात येईल.
10) सदरची योजना उपलब्ध निधीच्या प्रमाणात राबविली जाईल.

अर्ज करा

12   योजनेचे नांव - ५% दिव्यांग कल्याण सेस फंड अंतर्गत दिव्यांग शेतकर्‍यांना शेतीपूरक व्यवसायासाठी शेतीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन, मत्स्य व दुग्ध व्यवसाय इत्यादीसाठी अर्थसहाय्य देणे या योजनेसाठी अर्ज

1) शेतकरी लाभार्थ्यांचे दिव्यांग असलेबाबतचे ऑनलाईन सक्षम अधिका-याचे वैद्यकिय प्रमाणपत्र जोडणे आवश्यक. (अपंगत्व कमीत कमी 40% असावे)
2) लाभार्थ्यांचा दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नंबर असल्यास दा.रे.दाखला अथवा रु.1,00,000/- च्या आत उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला दाखला जोडणेत यावा.
3) लाभार्थ्यांने यापुर्वी सदर योजनेचा लाभा घेतला नाही याबाबतचा सरपंच/ग्रामसेवक/ग्रा.वि.अधिकारी यांचा दाखला.
4) लाभार्थी अल्पभुधारक शेतकरी असावा व त्याबाबत नमुना 8 अ चा उतारा जोडणेत यावा.
5) शेतीपुरक व्यवसायाची देखभाल ही लाभार्थ्यांनी वैयक्तिक करावी.
6) शेतीपुरक व्यवसायासाठी घेतलेली शेळी, कोंबड्या,वराह, मत्स्य व दुग्धव्यवसाय दुस-यास विकता येणार नाही.
7) लाभार्थ्याने शेतीपुरक व्यवसायाचा वापर स्वयंरोजगासाठी करावा.
8) लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती/ठराव समितीस राहील.
9) प्रती लाभार्थ्यांस रु.25000/- इतक्या रक्कमेचे मर्यादेत अनुदान देणेत येईल.
10) ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णय दिनांक 28/04/2016 नुसार शासन निर्णयान्वये पात्र लाभार्थ्यांना द्यावयाचे अनुदान जिल्हा परिषद स्तरावरून वित्तप्रेषणाद्यारे गट स्तरावर वितरीत करण्यात येईल व गट सतरावरुन मंजूर विद्यार्थी/लाभार्थ्यांच्या आधार निगडीत बँक खात्यात डि.बी.टी.मार्फत थेट अनुदान जमा करण्यात येईल.
11) सदरची योजना उपलब्ध निधीच्या प्रमाणात राबविली जाईल.

अर्ज करा

13   योजनेचे नांव - २०% जिल्हा परिषद सेस फंड अंतर्गत मागासवर्गीय लाभर्थ्यांना डिस्को जॉकी साहित्य पुरविणे

1) लाभार्थी गट हा किमान पाच मागासवर्गीय लाभार्थ्यांचा असावा. (अनु.जाती / अनु.जमाती, विजाभज)
2) लाभार्थ्यांच्या जातीचा दाखला सक्षम अधिका-याचा असावा. लाभार्थ्यांचा दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नंबर असल्यास दा.रे.दाखला अथवा रु.1,00,000/- च्या आत उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला दाखला जोडणेत यावा.
3) अर्जासोबत लाभार्थींच्या आधारकार्ड व रेशनकार्ड छायांकित प्रती जोडणेत याव्यात.
4) साहित्य पुरविल्यानंतर देखभाल व दुरुस्ती ही लाभार्थ्यांनी वैयक्तिक जबाबदारी राहील.
5) डिस्को जॅकी (DJ) दुस-यास विकता येणार नाही.
6) लाभार्थ्यांने डिस्को जॅकी (DJ) चा वापर स्वयंरोजगारासाठी करावा.
7) लाभार्थ्यांचे अर्ज ग्रामपंचायत/पंचायत समितीच्या शिफारशीसह समाज कल्याण विभागास सादर करावेत.
8) लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती/ठराव समितीस राहिल.
9) अर्ज सादर करावयाच्या दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त झाल्यास तसेच अर्जासोबत परिपुर्ण कागदपत्रे न जोडल्यास सदरच्या अर्जाचा मंजूरीसाठी विचार केला जाणार नाही.
10) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्रमांक: भांखस-2014/प्र.क्र.82/भाग-III/उद्योग-4 मुंबई दिनांक 1.12.2016/ शासन निर्णय क्रमांक: संर्किण-2016/ प्र.क्र.215/उद्योग-4 मुंबई दिनांक 24.08.2017 नुसार अंमलबजावणी करण्यात येईल.
11) सदरची योजना उपलब्ध निधीच्या प्रमाणात राबविली जाईल.

अर्ज करा

14   योजनेचे नांव - २०% जिल्हा परिषद सेस फंडातून घेण्यात आलेल्या मागासवर्गीय वस्तीतील समाज मंदिरामध्ये भांडी पुरविणे/ बचतगटांना भांडी पुरविणे

1) सदर योजनेचा लाभ हा मागासवस्तीमधील (अनु.जाती /अनु.जमाती/ विजाभज) या प्रवर्गातील वस्त्यामधील समाज मंदिरास लाभ देण्यास पात्र राहतील व तसा ग्रामपंचायतीचा ठराव जोडणेत यावा.
2) मागासवर्गीय वस्तीमध्ये समाज मंदिर असावे व अर्जासोबत नमुना नंबर 8 जोडणे व ग्रामपंचायतमधील समाजमंदिराचा फोटो जोडणे आवश्यक आहे .
3) इमारतीची देखभाल योग्य घेतली जात असल्याचा ग्रामसेवक / सरपंच यांचा दाखला जोडणे आवश्यक.
4) सदर योजनेचे प्रस्ताव अर्ज ग्रामपंचायत/पंचायत समितीच्या शिफारशीसह समाज कल्याण विभागास सादर करावेत.
5) सदर योजनेच्या प्राप्त प्रस्तावाची अंतिम निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती/ ठराव समितीस राहील.
6) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्रमांक: भांखस-2014/प्र.क्र.82/भाग-III/उद्योग-4 मुंबई दिनांक 1.12.2016/ शासन निर्णय क्रमांक: संर्किण-2016/ प्र.क्र.215/उद्योग-4 मुंबई दिनांक 24.08.2017 नुसार अंमलबजावणी करण्यात येईल.
7) सदरची योजना उपलब्ध निधीच्या प्रमाणात राबविली जाईल.

अर्ज करा

15   योजनेचे नांव - मागासवर्गीय इयत्ता ११ वी १२ वी तील विद्यार्थ्यांना MH-CET ENGINEERING / JEE / NEET च्या प्रशिक्षणवर्गाची खाजगी संस्थेला दिलेल्या फीची प्रतिपूर्तीकरणे पुरविणे

1) विद्यार्थी हा मागासवर्गीयांपैकी अनु.जाती / अनु.जमाती/ विजाभज या संवर्गाचा असावा.
2) विद्यार्थ्याचा जातीचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला जोडणेत यावा.
3) विद्यार्थी हा शिक्षण घेत असावा. इयत्ता 10 वी पास व त्यापुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असावा व बोनाफाईड जोडणे आवश्यक. 11 /12 वी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
4) विद्यार्थ्यांचा कुटुंबाचा दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नाव असल्यास दा.रे.दाखला अथवा रु.1,00,000/- च्या आत उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला दाखला जोडणेत यावा.
5) विद्यार्थ्यांचे वैयक्तिक बँक पासबुक,आधारकार्ड व रेशनकार्ड छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
6) विद्यार्थ्यांचे अर्ज ग्रामपंचायत/पंचायत समितीच्या शिफारशीसह समाज कल्याण विभागास सादर करावेत.
7) विद्यार्थी निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती/ ठराव समितीस राहील.
8) अर्ज सादर करावायाच्या दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त झाल्यास तसेच अर्जासोबत परिपुर्ण कागदपत्रे न जोडल्यास सदरच्या अर्जाचा मंजूरीसाठी विचार केला जाणार नाही.
9) गटस्तरावरुन प्रस्ताव मागवुन विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना अनुक्रमे
10) MH-CET Engineering/JEE/NEET च्या प्रशिक्षण वर्गाकरीता आर्थिक सहाय्य रु.70,000/- प्रति विद्यार्थी.
11) दिनांक 05.12.2016 रोजीच्या नियोजन विभागाकडील शासन निर्णयान्वये पात्र लाभार्थ्यांना द्यावयाचे अनुदान जिल्हा परिषद स्तरावरून वित्तप्रेषणाद्यारे गट स्तरावर वितरीत करण्यात येईल व गट सतरावरुन मंजूर विद्यार्थी/लाभार्थ्यांच्या आधार निगडीत बँक खात्यात डि.बी.टी.मार्फत थेट अनुदान जमा करण्यात येईल.
12) सदरची योजना उपलब्ध निधीच्या प्रमाणात राबविली जाईल.

अर्ज करा

16   योजनेचे नांव - दिव्यांग परंतु विधवा / परितक्त्या / घटटस्फ़ोटित / ॲसिड अटॅक लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे

लाभार्थी दिव्यांग असलेबाबतचे ऑनलाईन सक्षम अधिका-याचे वैद्यकिय प्रमाणपत्र (अपंगत्व कमीत कमी 40%) असावे. तसेच मतिमंद लाभार्थ्यांस सदर योजनेचा लाभ देता येणार नाही.
3) लाभार्थ्यांचा दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नंबर असल्यास दा.रे.दाखला अथवा रु.1,00,000/- च्या आत उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला दाखला जोडणेत यावा.
4) लाभार्थी गरजू व पात्र तसेच सद्यस्थितीत बेरोजगार असलेबाबतचा ग्रामपंचायतीचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
5) लाभार्थ्याकडे विजेची जोडणी असणे आवश्यक आहे. विद्युत बिल जोडणे आवश्यक.
6) सदर योजनेचे प्रस्ताव अर्ज ग्रामपंचायत/पंचायत समितीच्या शिफारशीसह समाज कल्याण विभागास सादर करावेत.
7) वैयक्तिक लाभार्थ्याचे बँक तपशिलासोबत बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC Code, बँक शाखा व पत्ता, सोबत पॅनकार्ड नंबर व आधारकार्ड नंबर अर्जात नमुद करणे आवश्यक असून अर्जासोबत त्याच्या छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
8) अर्जासोबत निवड केलेल्या व्यवसायाचे दरपत्रक जोडणे आवश्यक आहे.
9) सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर वस्तू /साहित्याची खरेदी न करता त्याकरिता निश्चित करण्यात आलेल्या रक्कमेचे अनुदान लाभार्थ्याच्या खात्यावर करण्यात येईल.
10) दिव्यांग लाभार्थी वास्तव्यास असलेल्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकाने दिव्यांग लाभार्थ्यास दिलेल्या लाभाबाबतचा अहवाल (खरेदीच्या पावतीसह) तसेच उपयोगिता प्रमाणपत्र समाज कल्याण विभागास सादर करावा.
11) सदर योजनेच्या प्राप्त प्रस्तावाची अंतिम निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती/ ठराव समितीस राहील.

अर्ज करा

17   योजनेचे नांव - अपंग पालकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी अर्थ सहाय्य देणे

1 पालक दिव्यांग असलेबाबतचे ऑनलाईन सक्षम अधिका-याचे वैद्यकिय प्रमाणपत्र (अपंगत्व कमीत कमी 40%) असावे.
2) लाभार्थ्यांचा दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नंबर असल्यास दा.रे.दाखला अथवा रु.1,00,000/- च्या आत उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला दाखला जोडणेत यावा.
3) अर्जदाराचा पाल्य शाळा / महाविद्यालय / तांत्रिक शिक्षण संस्थेत नियमित शिक्षण घेत असावा. सध्या शिकत असलेल्या शाळा/विद्यालय/ महाविद्यालयाचे प्रमाणपत्र/ बोनाफाईड आवश्यक.
4) एकाच अपंग पालकास दोन किंवा अधिक मुले असल्यास, फक्त दोन मुलांनाच सहाय्य पात्र असेल.
5) सदर योजनेचे प्रस्ताव अर्ज ग्रामपंचायत/पंचायत समितीच्या शिफारशीसह समाज कल्याण विभागास सादर करावेत.
6) वैयक्तिक लाभार्थ्याचे बँक तपशिलासोबत बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC Code, बँक शाखा व पत्ता, सोबत कुटुंबाचे रेशनकार्ड व आधारकार्ड नंबर अर्जात नमुद करणे आवश्यक असून अर्जासोबत त्याच्या छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
7) सदर योजनेच्या प्राप्त प्रस्तावाची अंतिम निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती/ ठराव समितीस राहील.
8) सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर निश्चित करण्यात आलेल्या रक्कमेचे अनुदान लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल.
9) ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णय दिनांक 05/12/2016 नुसार शासन निर्णयान्वये पात्र लाभार्थ्यांना द्यावयाचे अनुदान जिल्हा परिषद स्तरावरून वित्तप्रेषणाद्यारे गट स्तरावर वितरीत करण्यात येईल व गट स्‍तरावरुन मंजूर लाभार्थ्यांच्या आधार निगडीत बँक खात्यात डि.बी.टी.मार्फत थेट अनुदान जमा करण्यात येईल.
10) सदरची योजना उपलब्ध निधीच्या प्रमाणात राबविली जाईल.

अर्ज करा

18   योजनेचे नांव - अपंग व्यक्तींचे रहाणीमान उंचवण्याच्या दृष्टीने सोलर कंदिल,सौरचुल,बायोगॅस प्लांट इ.घरगुती गरजांसाठी अर्थसहाय्य देणे

1) लाभार्थी दिव्यांग असलेबाबतचे ऑनलाईन सक्षम अधिका-याचे वैद्यकिय प्रमाणपत्र (अपंगत्व कमीत कमी 40%) असावे.
2) लाभार्थ्यांचा दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नंबर असल्यास दा.रे.दाखला अथवा रु.1,00,000/- च्या आत उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला दाखला जोडणेत यावा.
3) सदर योजनेचे प्रस्ताव अर्ज ग्रामपंचायत/पंचायत समितीच्या शिफारशीसह समाज कल्याण विभागास सादर करावेत.
4) वैयक्तिक लाभार्थ्याचे बँक तपशिलासोबत बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC Code, बँक शाखा व पत्ता, सोबत कुटुंबाचे रेशनकार्ड व आधारकार्ड नंबर अर्जात नमुद करणे आवश्यक असून अर्जासोबत त्याच्या छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
5) दिव्यांग लाभार्थी वास्तव्यास असलेल्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकाने दिव्यांग लाभार्थ्यास दिलेल्या लाभाबाबतचा अहवाल (खरेदीच्या पावतीसह) तसेच उपयोगिता प्रमाणपत्र समाज कल्याण विभागास सादर करावा.
6) सदर योजनेच्या प्राप्त प्रस्तावाची अंतिम निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती/ ठराव समितीस राहील.
7) सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर निश्चित करण्यात आलेल्या रक्कमेचे अनुदान लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल.
8) ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णय दिनांक 05/12/2016 नुसार शासन निर्णयान्वये पात्र लाभार्थ्यांना द्यावयाचे अनुदान जिल्हा परिषद स्तरावरून वित्तप्रेषणाद्यारे गट स्तरावर वितरीत करण्यात येईल व गट स्‍तरावरुन मंजूर लाभार्थ्यांच्या आधार निगडीत बँक खात्यात डि.बी.टी.मार्फत थेट अनुदान जमा करण्यात येईल.
9) सदरची योजना उपलब्ध निधीच्या प्रमाणात राबविली जाईल.

अर्ज करा

19   योजनेचे नांव - सामाजिक अत्याचाराला बळी पडलेल्या पिडीत अपंग महिलांना त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी अर्थसहाय्य

1) लाभार्थी दिव्यांग महिला किंवा तिचा कायदेशीर प्रतिनिधी / पालक यांनी निश्चित अर्जपत्र भरून ग्रामपंचायत/ पंचायत समिती येथे सादर करणे.
2) अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे (दिव्यांगत्व प्रमाणपत्र, अत्याचाराचा पुरावा / तक्रारीची नोंद, रहिवासी दाखला इ.) जोडणे.
3) वैयक्तिक लाभार्थ्याचे बँक तपशिलासोबत बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC Code, बँक शाखा व पत्ता, सोबत कुटुंबाचे रेशनकार्ड व आधारकार्ड नंबर अर्जात नमुद करणे आवश्यक असून अर्जासोबत त्याच्या छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
4) सदर योजनेचे प्रस्ताव अर्ज ग्रामपंचायत/पंचायत समितीच्या शिफारशीसह समाज कल्याण विभागास सादर करावेत.
5) सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर निश्चित करण्यात आलेल्या रक्कमेचे अनुदान लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल.
6) सदर योजनेच्या प्राप्त प्रस्तावाची अंतिम निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती/ ठराव समितीस राहील.
8) ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णय दिनांक 05/12/2016 नुसार शासन निर्णयान्वये पात्र लाभार्थ्यांना द्यावयाचे अनुदान जिल्हा परिषद स्तरावरून वित्तप्रेषणाद्यारे गट स्तरावर वितरीत करण्यात येईल व गट स्‍तरावरुन मंजूर लाभार्थ्यांच्या आधार निगडीत बँक खात्यात डि.बी.टी.मार्फत थेट अनुदान जमा करण्यात येईल.
9) सदरची योजना उपलब्ध निधीच्या प्रमाणात राबविली जाईल.

अर्ज करा

20   योजनेचे नांव - अंध व्यक्तीसाठी मोबाईल फोन,लॅपटॉप/संगणक(जॉससॉफ्टवेअर) इ.सहाय्यभुत साधणे व उपकरणांसाठी अर्थसहाय्य

1) अंध विदयार्थी/ इतर नागरीक (ग्रामिण भागातील)
2) लाभार्थी अंध असलेबाबतचे ऑनलाईन सक्षम अधिका-याचे वैद्यकिय प्रमाणपत्र असावे.
3) लाभार्थ्यांचा दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नंबर असल्यास दा.रे.दाखला अथवा रु.1,00,000/- च्या आत उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला दाखला जोडणेत यावा.
4) सदर योजनेचे प्रस्ताव अर्ज ग्रामपंचायत/पंचायत समितीच्या शिफारशीसह समाज कल्याण विभागास सादर करावेत.
5) वैयक्तिक लाभार्थ्याचे बँक तपशिलासोबत बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC Code, बँक शाखा व पत्ता, सोबत पॅनकार्ड नंबर व आधारकार्ड नंबर अर्जात नमुद करणे आवश्यक असून अर्जासोबत त्याच्या छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
6) अर्जासोबत स्मार्ट चष्मे चे दरपत्रक जोडणे आवश्यक आहे.
7) सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर वस्तू / साहित्याची खरेदी न करता त्याकरिता निश्चित करण्यात आलेल्या रक्कमेचे अनुदान लाभार्थ्याच्या खात्यावर करण्यात येईल.
8) दिव्यांग लाभार्थी वास्तव्यास असलेल्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकाने दिव्यांग लाभार्थ्यास दिलेल्या लाभाबाबतचा अहवाल (खरेदीच्या पावतीसह) तसेच उपयोगिता प्रमाणपत्र समाज कल्याण विभागास सादर करावा.
11) सदर योजनेच्या प्राप्त प्रस्तावाची अंतिम निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती/ ठराव समितीस राहील.
12) ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णय दिनांक 28/04/2016 नुसार शासन निर्णयान्वये पात्र लाभार्थ्यांना द्यावयाचे अनुदान जिल्हा परिषद स्तरावरून वित्तप्रेषणाद्यारे गट स्तरावर वितरीत करण्यात येईल व गट स्‍तरावरुन मंजूर विद्यार्थी/लाभार्थ्यांच्या आधार निगडीत बँक खात्यात डि.बी.टी.मार्फत थेट अनुदान जमा करण्यात येईल.
13) सदरची योजना उपलब्ध निधीच्या प्रमाणात राबविली जाईल.

अर्ज करा

21   योजनेचे नांव - अतितीव्र अपंगांच्या पालकांना एकवेळ अर्थसहाय्य देणे

1) दिव्यांग लाभार्थीचे दिव्यांगत्व 80% वर असावे व तसे दिव्यांग प्रमाणपत्र जोडणेत यावे.
2) दिव्यांग लाभार्थ्यांचा कुटुंबाचा दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नाव असल्यास दा.रे.दाखला अथवा रु.1,00,000/- च्या आत उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला दाखला जोडणेत यावा.
3) दिव्यांग लाभार्थ्यांचे व पालकाचे संयुक्तिक बँक पासबुक प्रत जोडणे आवश्यक.
4) लाभार्थ्यांचे व पालकाचे आधारकार्ड व रेशनकार्ड छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
5) दिव्यांग लाभार्थ्यांचा अर्ज ग्रामपंचायत/पंचायत समितीच्या शिफारशीसह समाज कल्याण विभागास सादर करावेत.
6) दिव्यांग लाभार्थीची निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती/ ठराव समितीस राहील.
7) अर्ज सादर करावायाच्या दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त झाल्यास तसेच अर्जासोबत परिपुर्ण कागदपत्रे न जोडल्यास सदरच्या अर्जाचा मंजूरीसाठी विचार केला जाणार नाही.
8) गटस्तरावरुन प्रस्ताव मागवुन विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना एकवेळ रक्कम रुपये 25,000/- थेट दिव्यांग लाभार्थ्यांचे व पालकाचे आधारकार्ड संलग्न संयुक्तिक बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येईल.
9) ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णय दिनांक 28/04/2016 नुसार शासन निर्णयान्वये पात्र लाभार्थ्यांना द्यावयाचे अनुदान जिल्हा परिषद स्तरावरून वित्तप्रेषणाद्यारे गट स्तरावर वितरीत करण्यात येईल व गट सतरावरुन मंजूर विद्यार्थी/लाभार्थ्यांच्या आधार निगडीत बँक खात्यात डि.बी.टी.मार्फत थेट अनुदान जमा करण्यात येईल.
10) सदरची योजना उपलब्ध निधीच्या प्रमाणात राबविली जाईल.

अर्ज करा

22   योजनेचे नांव - प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण व अन्य राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत अपंगांसाठी घरामध्ये आवश्यक मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कमाल रु. २०,००० /- प्रति लाभार्थी अर्थसहाय्य करणे

1) प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) किंवा अन्य राज्य पुरस्कृत गृहनिर्माण योजनेत घर मंजूर झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांची यादी संबंधित ग्रामपंचायतमार्फत तयार केली जाईल.
2) अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे (दिव्यांगत्व प्रमाणपत्र, गृहनिर्माण योजनेतील पात्रता, रहिवासी दाखला, नमुना नं 8 अ इ.) जोडणे.
3) लाभार्थी दिव्यांग असलेबाबतचे ऑनलाईन सक्षम अधिका-याचे वैद्यकिय प्रमाणपत्र (अपंगत्व कमीत कमी 40%) असावे.
4) लाभार्थ्यांचा दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नंबर असल्यास दा.रे.दाखला अथवा रु.1,00,000/- च्या आत उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला दाखला जोडणेत यावा.
5) वैयक्तिक लाभार्थ्याचे बँक तपशिलासोबत बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC Code, बँक शाखा व पत्ता, सोबत कुटुंबाचे रेशनकार्ड व आधारकार्ड नंबर अर्जात नमुद करणे आवश्यक असून अर्जासोबत त्याच्या छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
6) संबंधित अपंग लाभार्थ्याच्या गरजेनुसार (रॅम्प, रेलिंग, शौचालय, विशेष दरवाजे, हात धरण्यासाठी ग्रॅब बार इ.) घरात आवश्यक सुविधा कोणत्या कराव्यात याचा आराखडा सादर करावा.
7) सदर योजनेचे प्रस्ताव अर्ज ग्रामपंचायत/पंचायत समितीच्या शिफारशीसह समाज कल्याण विभागास सादर करावेत.
8) सदरचा लाभ रु.20,000/- च्या मर्यादेत राहिल.
9) निधीचा वापर केवळ अपंगत्वास अनुकूल सुविधा उभारण्यासाठीच केला जाईल.
10) सदर योजनेच्या प्राप्त प्रस्तावाची अंतिम निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समिती/ ठराव समितीस राहील.
11) ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णय दिनांक 05/12/2016 नुसार शासन निर्णयान्वये पात्र लाभार्थ्यांना द्यावयाचे अनुदान जिल्हा परिषद स्तरावरून वित्तप्रेषणाद्यारे गट स्तरावर वितरीत करण्यात येईल व गट स्‍तरावरुन मंजूर लाभार्थ्यांच्या आधार निगडीत बँक खात्यात डि.बी.टी.मार्फत थेट अनुदान जमा करण्यात येईल.
12) सदरची योजना उपलब्ध निधीच्या प्रमाणात राबविली जाईल.

अर्ज करा